Monday, May 20, 2024

अक्कलदाढ उशिरा येते हे काल महाराष्ट्राला दिसलं…शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला..

Raj Thackeray vs shivsena…
गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. राज ठाकरे यांच्या टीकेला शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे.

“काल मेट्रोचं तसंच इतर काही प्रकल्पांचं उद्घाटन झालं, त्याच्यावर बोला. तुमच्या भोंग्याचं, यांच्या भोंग्याचं काय करायचं यासाठी सरकार समर्थ आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. पुढे ते म्हणाले की, “शरद पवारांनी जातीवाद पसरवला असं म्हणता…पण सल्लामसलत करण्यासाठी त्यांच्या चरणाशी तुम्हीदेखील जात होतात. कशासाठी इतक्या मोठ्या माणसांवर बोलायचं. तेवढ्यापुरच्या टाळ्या मिळतात पण त्यादेखील प्रायोजित आहेत”.

शिवतीर्थावरचा भोंगा भाजपाचा होता अशी टीका यावेळी संजय राऊतांनी केली. तसंच अक्कलदाढ उशिरा येते हे काल महाराष्ट्राला दिसलं असा टोलाही लगावला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles