Breaking…. रोहिणी खडसे यांच्यावर शरद पवारांनी सोपविली मोठी जबाबदारी…

0
54

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शरद पवार यांनी रोहिणी खडसे यांना महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.
निवडी नंतर रोहिणी खडसे म्हणाल्या, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचे, पक्षाच्या कार्याध्यक्षा सौ. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आदरणीय आ. जयंत पाटील साहेब, पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खा. डॉ. फौजीया खान ताई यांचे आभार व्यक्त करते.
माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्तीला आदरणीय साहेबांनी संधी दिली. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी काम करीन. पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे, आ. डॉ. जितेंद्रजी आव्हाड, आ. अनिलजी देशमुख, खा. डॉ. अमोलजी कोल्हे, आ. रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात या संधीचा उपयोग मी पक्षाच्या संघटन वाढीसाठी, तसेच राज्यातील महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी करीन हीच ग्वाही यानिमित्ताने देते.