राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ ट्वीट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. नागपूरच्या विधानभवन परिसरात राज्य सरकारकडून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाई पेनावर बंदी घालण्यात आली आहे. याचा संदर्भ देत अमोल मिटकरींनी नवा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये अमोल मिटकरींनी विधानभवन परिसरात शाईच्या पेनाला बंदी मात्र सिगारेट ओढायला खुली परवानगी, असं म्हणत व्हिडिओ पोस्ट केला आहे.
विधान भवन परिसरात “शाईच्या पेनाला” बंदी मात्र सिगारेट ओढायला खुली परवानगी . विधान भवन परिसरातील आणखी एक पराक्रम, असं म्हणत अमोल मिटकरींनी या ट्विटसाठी गरमागरम हिवाळी अधिवेशन असा हॅशटॅग वापरला आहे.
विधान भवन परिसरात "शाईच्या पेनाला" बंदी मात्र सिगारेट ओढायला खुली परवानगी . विधान भवन परिसरातील आणखी एक पराक्रम..
( माहितीसाठी).#गरमागरमहिवाळीअधिवेशन pic.twitter.com/R0BUDbZwdT— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 25, 2022