सलग तिसऱ्यांदा खासदार झालेल्या 71 लोकप्रतिनिधींच्या संपत्तीत 286 टक्क्यांनी वाढ झाली आहे, याबाबतचा एक अहवाल समोर आला आहे. यामध्ये भाजपचे 43, काँग्रेसचे 10, तृणमूल काँग्रेसचे 7, बीजेडी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2-2 खासदार आहेत.
सर्वात जास्त महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे.
एडीआरच्या रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत 173 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2009 मध्ये सुप्रिया सुळे यांची संपत्ती 51.53 कोटी रुपये इतकी होती. 2019 मध्ये 173 टक्क्यांनी वाढून 140.88 कोटी रुपये इतकी झाली. दहा वर्षात सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये 89.35 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.