अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपद…आ.रोहित पवार यांची मोठी प्रतिक्रिया…

0
42

महाराष्ट्रात विविध ठिकाणी ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले अजित पवारांचे काही बॅनरही लावले आहेत. अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री बनण्याची क्षमता आहे. ते मुख्यमंत्री बनले तर महाराष्ट्राला फायदाच होईल, असं विधान रोहित पवारांनी केलं, ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

रोहित पवार म्हणाले, “अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळालं, तर महाराष्ट्राला फायदाच होईल. कारण आजच्या नेत्यांच्या तुलनेत अजित पवारांची प्रशासनावर मजबूत पकड आहे. त्यामुळे कुठलंही काम लवकरात लवकर कसं होईल आणि सामान्य लोकांना न्याय कसा मिळेल? हे आपण अजित पवारांकडून शिकू शकतो. हे समीकरण महाराष्ट्रात बसवायचं असेल तर महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि पक्ष एकत्र बसून हे ठरवतील. त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. आमदार किंवा एक कार्यकर्ता म्हणून मला विचारलं तर मी एवढंच सांगेन अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री बनण्याची नक्कीच क्षमता आहे.”