अजित पवारांनी आज राष्ट्रवादीला धक्का देत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे नातू व कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार कोणाला साथ देणार याची चर्चा नगर जिल्ह्यात सुरू झाली आहे. दरम्यान रोहित पवार यांनी सूचक ट्विट करत आपण शरद पवार यांच्या बरोबरच असल्याचे सूचित केले आहे. आ. पवार यांनी म्हटले आहे की,
वाट आहे संघर्षाची…
म्हणून थांबणार कोण?
सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा
दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा…
मग संघर्षाला घाबरतंय कोण?
लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच…
वाट आहे संघर्षाची…
म्हणून थांबणार कोण?
सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा
दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा…
मग संघर्षाला घाबरतंय कोण?
लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच… pic.twitter.com/fORmLbW6tk— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 2, 2023