अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष, शरद पवारांचा फोटो वापरणार नाही…

0
31

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या याचिकेत आम्ही तसा स्पष्ट उल्लेख केला आहे,’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. शरद पवार यांचा फोटो आम्ही यापुढे वापरणार नाही, असेही ते म्हणाले. तटकरे छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते.

आगामी निवडणूका आम्ही अजित पवार यांच्याच नेतृत्वाखाली घड्याळ चिन्हावर लढणार आहोत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत नाही. सर्व कायदेशीर आणि वैधानिक बाबींची पडताळणी करुन आम्ही सत्तेत सहभागी झालो आहोत, निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. गुणवत्तेच्या आधारावर निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल,’ असेही तटकरे यांनी सांगितले.