अजूनही अजित पवार व शरद पवार एकत्र येतील ! आ.रोहित पवार म्हणाले….

0
30

शरद पवार व अजित पवार एकत्र येण्यास अजूनही संधी आहे, अशी प्रतिक्रिया आ. रोहित पवार यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. दोन्ही गटाकडून आयोजित केलेल्या बैठकीवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, “त्यांची (अजित पवार गट) बैठक भुजबळ सिटीला आहे. तर शरद पवारांनी वाय बी सेंटरला बैठक बोलावली आहे. म्हणजे बैठकीचं ठिकाण निवडतानाच किती मोठा फरक आहे, ते बघा. या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ज्यांनी महाराष्ट्रासाठी खूप काही केलं आहे. त्यांच्या नावाने असलेल्या सभागृहात शरद पवार बैठक घेणार आहेत. तिथेच सर्व पदाधिकारी आणि आमदार-खासदार येतील.”

अजित पवार व शरद पवारांनी एकत्र राहिलं पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. यावर तुमचं मत काय? असं विचारलं असता रोहित पवार पुढे म्हणाले,”माझंही मत असंच आहे की, अजित पवारांनी शरद पवारांबरोबर राहायला हवं होतं. दोघं एकत्र येण्याची अजूनही संधी आहे. पण पुढे बघू काय होतंय ते. शेवटी जे काही होणार आहे, ते होणारच आहे. ते झाल्यानंतर शरद पवार जो निर्णय घेतील, तो निर्णय आम्हाला स्वीकारावा लागेल.”