राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलची जिल्हा कार्यकारणी जाहीर

0
778

शहर व जिल्ह्यातील कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे नूतन पदाधिकाऱ्यांना आव्हान – प्रा. माणिक विधाते. नगर – अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या शहर व जिल्हा कार्यकारणी संदर्भात पक्ष कार्यालय येथे बैठक घेऊन कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष प्रा.माणिक विधाते, जिल्हा सरचिटणीस सिताराम काकडे, जिल्हा अध्यक्ष गजानन भांडवलकर, दादासाहेब दरेकर, वैभव शेवाळे, युवराज सुपेकर, प्रसाद कर्नावट, लहू कराळे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.माणिक विधाते म्हणाले की शहर व जिल्ह्यातील कामगारांचे प्रश्न कार्यकारणीच्या माध्यमाने सुटणार असून सर्व पदाधिकाऱ्यांनी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन करून कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही. याची दक्षता घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे पदाधिकारी कटिबद्ध राहणार व सर्व समाजाला बरोबर घेऊन पक्षाचे कार्य सुरू आहे. या कार्याने प्रेरित होऊन मोठ्या संख्येने युवक राष्ट्रवादीशी जोडला जात असल्याचे सांगून नुतन कार्यकारिणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या युवकांना पक्षामध्ये विविध पदाच्या माध्यमातून संधी देण्यात आली आहे. नूतन कार्यकारणीत जिल्हा अध्यक्ष (नगर) गजानन भांडवलकर, जिल्हा उपाध्यक्ष (नगर) वैभव म्हसके, जिल्हा उपाध्यक्ष (नगर)अक्षय भिंगारदिवे, जिल्हा कार्याध्यक्ष (नगर) विशाल म्हसके, जिल्हा प्रवक्ता (नगर) नितीन लगडे, जिल्हा प्रवक्ता (पारनेर) प्रितेश पानमंद, जिल्हा सरचिटणीस (श्रीगोंदा) अभिजित जगताप, जिल्हा सरचिटणीस (पारनेर) उचाळे म्हातारबा, जिल्हा संघटक (कर्जत) सोनाली नेटके, उपजिल्हाध्यक्ष (संगमनेर) बाबासाहेब वाणी, जिल्हा सरचिटणीस (अकोला) रुपेश कासार, जिल्हा संघटक (नगर) सागर मकासरे, सोशल मीडिया प्रमुख (पारनेर) प्रदीप आवारी, तालुका अध्यक्ष (संगमनेर) शशिकांत पवार, तालुका अध्यक्ष (अकोला) संदीप शेंनकर, तालुका अध्यक्ष (शेवगाव) सिद्धार्थ घोडतळे, जिल्हासरचिटणीस (नगर) राम झीने, जिल्हा सचिव (नगर) संदीप सायबर, जिल्हा सरचिटणीस (नगर) हरीश आंधळे, जिल्हा संघटक (शेवगाव) अमोल काकडे, शहर अध्यक्ष (पाथर्डी) उबेद अतार, शहराध्यक्ष (शेवगाव) रोहन फडके, तालुका कार्याध्यक्ष (नगर) योगेश जासूद, तालुका अध्यक्ष (नगर) शरद कोतकर, तालुका उपाध्यक्ष (नगर) चंद्रशेखर पंचमुख