मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात आता ठाकरे घराण्यातील पुढची पिढी सहभागी होत आहे उद्धव यांचे पुतणे निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. निहार ठाकरे हे बिंदूमाधव यांचे चिरंजीव आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत. आता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते आपली राजकीय कारकिर्द सुरू करणार आहेत. पेशाने वकिल असलेले निहार आतापर्यंत राजकारणापासून अलिप्त होते. मात्र शिंदे गटाने त्यांना आता राजकीय अवकाश उपलब्ध करून दिला आहे. माजी मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश घडून आला आहे.