शिवसेना नेते संजय राऊत सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर सातत्यानं टीका करत आहेत. “शिंदे सतत दिल्लीला का जातात? आमचं हाय कमांड तर मुंबईत आहे. यापूर्वी शिवसेनेचे मुख्यमंत्री मातोश्रीवर जाऊन सल्ला मसलत करायचे, मग हे दिल्लीला का जातात?” असे खोचक सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौरावर केले. या प्रश्नावर उत्तर देताना नितेश राणे यांनी एक फोटो पोस्ट केला. आणि हे कोण आहेत उद्धव ठाकरेंचे जुळे भाऊ का? असा प्रश्न केला.
नितेश राणे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा एक फोटो पोस्ट केला. २०२० साली हे पिता-पुत्र सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते. तेव्हाचा हा फोटो आहे. या फोटोवर “गजनी राऊत यांच्या सांगण्यानुसार शिवसेनेचे मुख्यमंत्री कधीच हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीला आले नाहीत. मग या फोटोमध्ये कोण आहे? जुडवा?” अशी उपरोधिक कमेंट त्यांनी केली आहे. या फोटोवरून आता भाजपा समर्थक संजय राऊत यांना ट्रोल करत आहेत.
According to Ghajani Raut .. Sena CM has never come to delhi to meet high command..
So who is this in the pic ?
Judwaa? pic.twitter.com/JnliM1hA0j— nitesh rane (@NiteshNRane) July 18, 2022