नितीन गडकरींचे भाजपाकडून पहिल्या यादीत नावं का आले नाही! नितीन गडकरी म्हणाले…

0
14

नितीन गडकरींना भाजपाकडून नागपुरातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, ही उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर न करता दुसऱ्या यादीत जाहीर करण्यात आली. त्यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात असताना त्यावरही नितीन गडकरींनी स्पष्टीकरण दिलं आहे.
आमच्याकडे संसदीय समिती महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करते आणि त्यानंतर उमेदवारांची घोषणा केली जाते. पहिल्या यादीवेळी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व गुजरात या प्रदेशाच्या नेत्यांबरोबर ही पहिली चर्चा झाली. त्यामुळे तिथले उमेदवार जाहीर झाले. महाराष्ट्रात आमच्याबरोबर इतर पक्ष आहेत. त्यामुळे सगळ्यांची चर्चा करून संसदीय समितीसमोर जायला उशीर झाला. त्यामुळे माझं नाव दुसऱ्या यादीत आलं”, असं नितीन गडकरी म्हणाले.