OLA ची नवी ई स्कूटर सज्ज…ग्राहकांना मिळणार खास सवलत…Video

0
26

OLA ओलाचे गारुड अजून ही इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये कायम आहे. बेंगळुरुच्या या कंपनीची OLA S1 Air ही स्कूटर बाजारात येऊ घातली आहे. ओला कंपनीची एस1 एअर इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करण्यात येणार आहे. 28 जुलै 2023 रोजीपासून ही स्कूटर बाजारात दाखल होत आहे. ग्राहकांना सवलतीत ही स्कूटर खरेदी करता येईल. त्यासाठी 30 जुलै 2023 रोजीपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. 31 जुलै रोजीनंतर ई-स्कूटर खरेदी केल्यास, इलेक्ट्रिक स्कूटरसाठी 1,19,999 रुपये एक्स-शोरूम किंमत चुकती करावी लागेल. ही स्कूटर ओला कम्युनिटीवर अगोदर बुक करता येईल. 28 जुलै पूर्वी स्कूटरची बुकिंग करता येईल. ग्राहकांना त्याचा मोठा फायदा होईल. त्यांना 1,09,999 रुपये एक्स-शोरूम किंमत मिळेल. याविषयीची माहिती ट्विटर हँडलवर कंपनीने दिली आहे.

ओला एस1 एअर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आले आहे. ही स्कूटर 125 किमी गतीने धावण्याचा दावा करण्यात आला आहे. याची उच्चांकी गती 90 किमी/तास अशी आहे. यामध्ये एक हब मोटर आहे. त्याला ओला हायपरड्राइव मोटर असे म्हणतात. हे इलेक्ट्रिक स्कूटर 11.3 HP ची पॉवर आणि 58 NM का पीक टॉर्क देण्यास ही स्कूटर सक्षम आहे.