प्राथमिक शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य संघटनेने आपण या संपातून माघार घेत असल्याचे सांगत आपली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.
प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेची संपातून माघार घेतली जात असून या संपातून अडीच लाख कर्मचारी माघार घेतली असल्याचेही संभाजी थोरात यांनी सांगितले.
अडीच लाख कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता संपामध्ये फूट पडल्याचे सांगण्यात येत आहे. या संपातून कर्मचाऱ्यांनी माघार घेत आपण सरकारला समजून घेतले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
प्राथमिक शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य संघटनेने सरकारला आपण समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगत. पुढील निर्णयासाठी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले






