राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे फळांचे वाटप
नगर- आहिल्यानगर शहर शिवसेना यांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे फळांचे वाटप करण्यात आले .यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे ,बाबूशेठ टायरवाले ,शहरप्रमुख सचिन जाधव ,संभाजी कदम ,संजय शेंडगे दिलीप सातपुते ,गणेश कवडे ,शाम नळकांडे ,सचिन शिंदे ,दत्ता जाधव ,दत्ता कावरे ,महेश लोंढे ,संतोष गेनपा ,अनिल लोखंडे ,प्रशांत गायकवाड ,परेश लोखंडे ,काका शेळके ,आनंदराव शेळके ,सुनील लालबोन्द्रे ,रवी लालबोन्द्रे ,संदीप दातरंगे ,पोपट पाथरे ,विकी लोखंडे , घनश्याम घोलप ,अरुण झेंडे ,प्रवीण बेद्रे ,संतोष तनपुरे ,कुणाल खेरे ,अभि दहिहंडे ,सलोनी शिंदे ,तृप्ती साळवे ,सुनीता बहुले आदींसह महिला आघाडी ,व शिवसैनिक उपस्थित होते
यावेळी बोलताना अनिल शिंदे म्हणाले कि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे वाढदिवस निमित्त सप्ताह भर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . हे सर्व कार्यक्रम समाजपयोगी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आज आनंदऋषीजी हॉस्पिटल या ठिकाणी संभाजी कदम यांच्यावतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले
संभाजी कदम म्हणाले कि शिवसेना हि हिँदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व स्व आनंद दिघे यांच्या विचारावर चालणारी आहे आजही आम्ही ८० टक्के समाज कारण व २० टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे काम करत आहे. आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने शहराच्या विविध भागामध्ये समाजपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे त्यानी सांगितले .
शहर प्रमुख सचिन जाधव यांनी प्रसविक केले तर आनंदऋषी हॉस्पिटल चे डॉ भंडारी यांनी आभार मानले