कांदा निर्यात शुल्कच्या मुद्यावरुन शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लादले आहे. याविरोधात ठिकठिकणी शेतकरी आंदोलन करतायेत. या मुद्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. धनंजय मुंडे हे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा करणार आहेत.
कृषीमंत्री धनंजय मुंडे हे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. ते आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारमधील काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेअंती काही तोडगा निघणार का? की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बंद कायम राहणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.