विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे यांचा दावा, म्हणाल्या ही तर कार्यकर्त्यांची इच्छा!

0
804
pankaja munde

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. ‘मी विधान परिषदेत जावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे’, असं म्हणत पंकजांनी आपल्या ‘मन की बात’ बोलून दाखवली आहे.

“मी विधान परिषदेत जावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत माझी अशी कुणाशी चर्चा नाही. प्रत्येकवेळी निवडणूक आली की माझ्या नावाची चर्चा होते. आता हा पायंडा पडलेला आहे. पण माझी अशी कुणाशीही चर्चा झालेली नाही. अनेक नावं येत आहेत. माझ्या एकटीचं नाव पुढे येत नाहीय. अनेक जागा आहेत. पक्ष जो निर्णय घेईल ते निर्णय झाल्यावरच कळेल”, अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली.