पंकजा मुंडे पुन्हा आक्रमक…म्हणाल्या पाच वर्षांत अनेकांचा पराभव, त्यांना आमदारकी, मंत्रिपदं…

0
25

चार वर्षांपूर्वी परळी विधानसभा मतदार संघातून माझा पराभव झाला होता. त्यानंतर अनेकांचा पराभव झाला. त्यांना आमदारकी, मंत्रीपदे मिळाली आहेत. आपण यावर माझे नेते अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. मला माझा नेता मिळाला असून, त्यांच्याशी मी चर्चा करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत कार दुर्घटनेत निधन झाले होते. त्यांचा आज स्मृतीदिन आहे. यानिमित्त गोपीनाथ गडावर महाराष्ट्रातून आलेले नागरिक अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.राजकारणात कधीकधी कीर्तन करायला हवे असे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. मला रामायण आणि महाभारत यातील दाखले आवडतात. मला स्वच्छ आणि कोरी पाटी असलेला चेहरा हवा आहे, असे म्हणत गोपीनाथ मुंडे यांनी 2004 मध्ये मला प्रचारासाठी उभे केले. मी गेले 19 वर्षापासून राजकारण करत असल्याचे पंकजा मुंडे सांगितले.

एकाच विषयावर पुन्हा – पुन्हा बोलावे, एवढे माझे शब्द लेचेपेचे नाही. मी आजपर्यंत अनेकदा माझी भूमिका स्पष्टपणे घेतलली आहे. माझे शब्द ठाम असतात. एकदा सोडलेला बाण पुन्हा मागे घेता येत नाही. त्यामुळे मी जे काही बोलते, त्यावर ठाम राहत असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.