नगर: लोकसभा निवडणुकीसाठी बीड मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यात संपर्क सुरू केला आहे. पुण्यातून बीडकडे जात असताना मुंडे यांचे नगरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. खासदार डॉ सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे, अक्षय कर्डिले आदींनी पंकजा मुंडे यांचे स्वागत केलं. पंकजा मुंडे यांचा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांत मोठा प्रभाव आहे. या पार्श्वभूमीवर कर्डिले यांच्या निवासस्थानी भाजपचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांनी मुंडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. प






