मला विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी, ही लोकांची इच्छा आहे. हीच माझी शक्ती आहे. आता पक्ष याबाबत लवकरच निर्णय घेईल. घोडामैदान फार लांब नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. यावेळी पंकजा मुंडे यांना, गेल्या अडीच वर्षांमध्ये भाजपने तुम्हाला विधानपरिषदेत जाण्याची संधी का दिली नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पंकजा यांनी म्हटले की, मी संधीची अपेक्षा करत नाही, तो माझा स्वभाव नाही. राजकारणात संधी मिळावी म्हणून वाट पाहणाऱ्यांपैकी मी नाही. मी जे मिळेल त्यामधूनच संधी निर्माण करते. गोपीनाथ मुंडे यांनीही जे जे पद भुषवले, ते आपल्या कर्तृत्त्वाने मोठे करून दाखवले. त्यामुळे आमच्यावर ‘संधीचं सोनं करावं’, हे संस्कार झाले आहेत.






