पंकजा मुंडे असं का म्हणाल्या…मला ‘ती’निवडणूक लढवू दिली असती तर..

0
22

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये कायमच आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असतं. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला होता. तुम्ही जर मला 2019 ला निवडून दिलं असतं तर वेगळं चित्र असतं असं पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं होतं. पंकजा मुंडे यांच्या या टीकेला आता धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

2009 ला जर मला निवडणूक लढऊ दिली असती तर आज परळी मतदारसंघ 15 वर्ष पुढे गेला असता. बारामती, इस्लामपूरपेक्षाही जास्त विकास मतदारसंघाचा झाला असता. दहा वर्ष तुम्ही सत्तेत होता मंत्री झालात मग या भागाचा विकास का केला नाही? असा सवाल उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. तालुक्यातील धर्मापुरी येथे जलजीवन मिशनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.