मुंबई : विधानपरिषदेसाठी भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे मुंडे समर्थकांकडून भाजप विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आता भाजपवर निशाणा साधला जात आहे. याबाबत पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली असून पुढील दोन दिवस अजून मी माझी भूमिका मांडणार नाही, असे म्हंटले आहे.
राज्यात राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात भाजपकडून अनेकांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुले ते नाराज आहेत. तर त्याच्या असमर्थकांकडून संतापही व्यक्त केला जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचा समावेश आहे.