पंकजा मुंडेंची जबरदस्त फॅन, पाच वर्षांची चिमुरडी नांदेडहून पोहचली परळीत

0
20

नांदेड जिल्ह्यात राहणारी पाच वर्षाची शर्वरी असे तिचे नाव. आपल्या आवडत्या पंकजाताईंना भेटण्यासाठी ती थेट परळीत आई-वडिलांना घेवून आली. तिची भेटण्याची प्रबळ इच्छा पाहून पंकजा मुंडे यांनीही तिला भेट देत तिचे कौतुक केले. आपल्याला पंकजाताईंना भेटायचंच असा हट्ट तिने कुटुंबियांकडे धरला होता. नांदेड येथील साईनाथ हमंद यांची मुलगी शर्वरी हिला पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाचे प्रचंड वेड आहे. त्यांची भाषणे, मुलाखती, त्याचबरोबर त्यांच्यातील कणखरपणा तीला आवडतो. पंकजा मुंडे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी काही मिनिटे तरी बोलता यावे, अशी तिचा इच्छा होती.

पंकजा मुंडे परळीत असल्याचे तिला समजले आणि तिने आई-वडिलांना घेवून थेट परळी गाठली. पंकजा याही तिला भेटल्या, तिच्याशी छान गप्पा मारल्या. तिने गायलेले गाणंही ऐकलं. तिच्यासोबत फोटो काढले आणि एवढया लहान वयात तिच्या अंगी असलेल्या कलागुणांच तोंडभरून कौतुकही केले.