कृषिमंत्र्यांच्या परळीत ‘शासन आपल्या दारी’…मंडपासाठी २ कोटी, लाईटसाठी ९० लाखांचा खर्च…

0
32

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या खर्चावरुन महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात अर्थात परळी येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम लवकरच होणार आहे. ‘शासन आपल्या दारी… खर्च देखील सर्व सामान्यांच्या माथ्यावरी…’ असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे मोजक्या शब्दांत सरकारवर जोरदार टीका केली.

पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांनी परळी येथील नियोजित कार्यक्रमाच्या मंडपासाठी जवळपास २ कोटी २१ लाख ९० हजार ८५० रुपयांची निविदा मागवण्यात आली आहे. मुख्य मंडपासाठी ८१ लाख ९४ हजार १०० रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे. साईड मंडपासाठी ६० लाख १४ हजार १४० रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे तर इलेक्ट्रिक कामांसाठी ७९ लाख ८२ हजार ५१० रुपयांची निविदा मागवण्यात आली आहे.