Monday, May 6, 2024

मंत्री विखे पाटील म्हणाले, पारनेर तालुक्यातील दहशतीला मतपेटीतून उत्तर देण्याची वेळ….

पारनेर: ग्रामपंचायत, सोसायटीच्या निवडणूका असल्या की त्यात लक्ष घालायचे लोकांमध्ये दहशत निर्माण करायची दमबाजी करायची हे असले उद्योग तालुक्यात गेले साडेचार वर्षे सुरू होते. येणार्‍या निवडणुकीत याचे उत्तर तुम्हाला मतपेटीतून द्यायचे असून या त्रासाला जनता कंटाळली म्हणून डॉ. सुजय विखे यांचा विजय निश्चित आहे असा टोला महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता लगावला.

पालकमंत्री विखे पाटील यांनी बुधवार दि. २४ रोजी सकाळी ११ वाजता पारनेर तालुयातील सुपा जिल्हा परिषद गटात सुपा येथील तालुका दूध संघाचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच दत्तात्रय पवार यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

मंत्री विखे म्हणाले की, महायुतीच्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. त्यात दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला असून आज पर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यावर सुमारे ७० कोटी रुपये जमा झाले आहे. काही दूध उत्पादक शेतकरी तालुयाच्या व जिल्ह्याच्या बाहेर दूध घालतात अशा शेतकर्‍यांना अनुदानापासून वंचित रहावे लागले. त्याचे मुख्य कारण म्हणजे कागदपत्रे सादर करण्यात अडचणी येऊ लागल्या.

परंतु त्याही आपण दूर केल्या आहेत. भविष्यात एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही विखे यांनी उपस्थितांना दिली. याचा निर्णय मी स्वतः घेणार असून मला कोणाला विचारायची गरज नाही. यामुळे जिल्ह्यातील दूध भेसळ कमी झाल्याचे आवर्जून सांगत भविष्यात भेसळ बंद करून निर्मळ वातावरण निर्माण करायचे असे सांगितले.

तालुयात हुल्लडबाजांची काही कमी नाही, त्यामुळे सुपा औद्योगिक वसाहतीमधील अनेक उद्योग बाहेर गेले याला सर्वस्वी जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करत भविष्यात उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणारा खासदार आपणास निवडून द्यायचा आहे असेही ते म्हणाले.

Related Articles

1 COMMENT

  1. सुजय विखेंनी नगर मधील सर्व दहशदवादी सोबत घेतलेत आणि पारनेर मधील दहशद कमी करणारे म्हणताहेत.
    नुसती फेकाफेकी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles