Sunday, May 19, 2024

सैराट…प्रेम विवाहास विरोध करीत पोटच्या मुलीची निर्घूण हत्या

प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या मुलीची गळा आवळून खून केला आहे. परभणीच्या पालम तालुक्यातील नाव्हा येथे २१ एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. या घटनेला दहा दिवस उलटून गेल्यानंतर हत्येचे प्रकरण उजेडात आलं आहे.

इतर जातीच्या मुलाबरोबर विवाह का करतेस ? म्हणून परभणीत १९ वर्षीय मुलीचा जन्मदात्यानेच खून केला आहे. २१ एप्रिल रोजी ही घटना घडल्याचे सांगितले जातेय. त्यानंतर कोणालाही थांगपत्ता लागू न देता भावकीतील निवडक लोकांच्या उपस्थितीत मयत मुलीचे प्रेत रात्री जाळून पुरावा नष्ट करण्यात आला होता,मात्र पोलिसांना या घटनेची गुप्त माहिती प्राप्त झाल्याने हत्येचे प्रकरण उजेडात आले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वडील बालासाहेब भीमराव बाबर, आई रुक्मिणीबाई बालासाहेब बाबर, गंगाधर योगाजी बाबर, राजेभाऊ रखमाजी बाबर, अशोक रुस्तुमराव बाबर, रुस्तुमराव दत्तराव अशोक बाबर आबासाहेब बाबर, अच्यूत बाबर, गोपाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles