Video : जेव्हा क्लाइंट घरच्यासारखे भेटते तेव्हा फोटोग्राफरांना सुद्धा आवरला नाही नाचण्याचा मोह!

0
24

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की लग्नात पाहूण्यांना स्टेजवर नाचताना पाहून फोटोग्राफर लोकांना सुद्धा मोह आवरला नाही आणि ते सुद्धा बिनधास्त नाचले. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. या व्हिडीओत स्टेजवर पाहूणे मंडळी मनसोक्त नाचताना दिसत आहे.प्रत्येक जण डान्स करताना दिसत आहे. नाचण्याचा आनंद घेताना दिसत आहे. या सर्वांचा व्हिडीओ शूट करताना काही फोटोग्राफर लोकही स्टेज खाली उभे असलेले दिसताहेत. या सर्वांना डान्स करताना पाहून फोटोग्राफर लोकांना सुद्धा मोह आवरत नाही आणि त्यांना सुद्धा डान्स करावासा वाटतो. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की फोटोग्राफर्स कॅमेरा हातात घेऊन डान्स करताना दिसत आहे. डान्स करताना ते शूट सुद्धा करत आहे. लग्नातील हा भन्नाट व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. या व्हिडीओत सर्व जण झिंग झिंग झिंगाट या लोकप्रिय मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “जेव्हा क्लाइंट घरच्यासारखे भेटते तेव्हा फोटोग्राफर”