अजितदादांची टोलेबाजी…एक किंवा दोन अपत्यांवरच थांबा…नाहीतर ब्रह्मदेव जरी आला ना…

0
16

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच टोलेबाजी केली. मी सकाळी लवकर आल्याने काही जणांची अडचण झाली, असा टोला अजितदादांनी लगावला. “माझी विनंती आहे, की बाबांनो तुम्ही एक किंवा दोन अपत्यांवरच थांबा, तेवढं मात्र करा, कारण मी बघतोय ३३ वर्षांपूर्वी… १९९१ मध्ये मी खासदार झालो, तेव्हा तिथलं पॉप्युलेशन केवढं होतं, आणि आता इतक्या वर्षांनी किती झालंय… त्यामुळे ब्रह्मदेव जरी आला ना, तरी तिथं सगळ्यांना घरं बांधून देऊ शकत नाही.. म्हणून..” असं अजितदादा म्हणाले. आमची पण काही जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी आहे, मी अजिबात नाकारत नाही” असं सांगायला अजित पवार विसरले नाहीत.