पीएम किसान योजनेचा 11 हप्ता मिळण्यासाठी ‘आधार’ बँक खात्याशी लिंक करा…

0
1212
pm kisan sanman yojna e kyc

pm kisan sanman nidhi..
पीएम किसान योजनेत नियमितता साधण्यासाठी दिवसेंदिवस नवनवीन नियम लागू केले जात आहेत. e-KYC साठी मुदतवाढ करण्यात आली असली तरी आता ज्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड हे बॅंक खात्याशी संलग्न आहे त्याच खात्यावर पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे e-KYC बरोबरच शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड हे बॅंक खात्याशी संलग्न आहे की नाही याची तपासणी करावी लागणार आहे.

पीएम किसान योजनेचे राज्यात 1 कोटी 9 लाख 33 हजार 298 शेतकरी लाभार्थी आहेत. असे असतानाच 1 कोटी 6 लाख 53 हजार 329 खातेदारांनी माहिती आधार नोंदणीनुसार प्रमाणित केली आहे. योजनेला तीन वर्ष पूर्ण झाले असतानाही 2 लाख 79 हजार शेतकऱ्यांनी आधार क्रमांकच सादर केला नाही. त्यामुळे दिलेली माहितीमध्ये काही चूक असेल किंवा त्यांची नावे ही प्रमाणित झालेली नाहीत.11 वा हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.