प्रहारचे आमदार बच्चू कडु यांचा अपघात, रस्ता ओलांडताना दुचाकी धडकली

0
15

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा रस्ता क्रॉस करताना अपघात झाल्याची घटना घडली आहे. त्यांना अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डोक्याला आणि उजव्या पायाला दुखावपत झाल्याची माहिती मिळाली आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. सकाळी 6 ते साडे सहाच्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने धडक दिली आहे. यामध्ये बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्यानं डोक्याला मार लागला आहे.