अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात नगरमध्ये तयार झालेल्या थ्री डी शिल्पाकृती… प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओत कामाला वेग… व्हिडिओ

0
36

अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे काम सुरू झालेले आहे, हे काम करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. या कामाचे वेगवेगळे टप्पे करण्यात आले आहेत. बांधकामाबरोबरच या ठिकाणी शिल्पकृती उभारण्याचेही काम सुरू आहे. या शिल्पकृतींसाठी स्वतंत्र समिती आहे. . मंदिरामध्ये काही शिल्पकृती उभारल्या जाणार असून त्या प्रदक्षिणा मार्गावर उभारण्यात येत आहेत. सध्या या शिल्पाकृती नगर शहरात साकारण्यात येत आहेत. प्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओत थ्री डी शिल्प तयार करण्यात येत आहेत.
या शिल्पाच्या माध्यमातून रामायणातील महत्त्वाचे प्रसंग दाखवण्यात येणार आहे. या शिल्पांसाठीचे चित्र प्रमोद कांबळे यांनी रेखाटले असून शिल्पाचे थ्रीडी मॉडेलही त्यांनी घडवण्यास सुरुवात केली आहे. मातीची थ्रीडी शिल्प सध्या प्रमोद कांबळे घडवत असून ती झाली की, जयपूर व राजस्थानला पाठवण्यात येणार आहे. मातीच्या शिल्पाप्रमाणे तिथे दगडांची शिल्पे बनविण्यात येणार आहेत.