पुणे जिल्ह्यातील आंबेठाण ग्रामपंचायतीला स्मार्ट व्हिलेज म्हणून राज्यात नामांकन मिळाले आहे. आता आणखी एक वेगळी गोष्ट गावात घडली आहे. गावच्या सरपंच संघमित्रा नाईकनवरे यांची लोकांमधून निवड झाली होती. आता त्यांचे पती दत्तात्रेय नाईकनवरे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे गावच्या ग्रामपंचायत इतिहासातली पती पत्नीच्या हाती कारभार असलेली ही पहिलीच वेळ असेल.
उपसरपंच तुळसाबाई घाटे यांनी राजीनामा दिल्याने या पदासाठी निवडणूक झाली. उपसरपंच पदासाठी दत्तात्रय नाईक नवरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच संघमित्रा नाईकनवरे या होत्या. तर ग्रामविकास अधिकारी रविंद्र उगले यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले.






