मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपच्या निष्ठवंतांची जिरणार नाही ना? … फडणवीस यांना कार्यकर्त्यांचा प्रश्न

0
28

राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागामुळे पुणे जिल्ह्यात मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. एवढे दिवस ज्यांच्याविरोधात काम केले आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

कालचा शपथविधीने भाजपची की राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार? मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपच्या निष्ठवंतांची जिरणार नाही ना? आम्हा निष्ठवंतांची काही सोय केलीये का? असे पत्राद्वारे पाच प्रश्न पारखी यांनी फडणवीसांना विचारले आहेत. साहेब जमलं तर जरूर उत्तर द्या, अशी सादही त्यांनी घातली आहे. आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता काय करायचे, असा प्रश्नही नवनाथ पारखी यांनी फडणवीसांना विचारला आहे.