pune congress कसबा, चिंचवड पोटनिवडणुकबाबत चर्चा करण्यासाठी नाना पटोले पुणे येथील काँग्रेस भवनात आले होते. या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि इतर पदाधिकारी आले होते. काँग्रेस भवनाच्या गेटवर एक मांजर आली होती. ही मांजर नेमकी नाना पटोले बाहेर पडत असताना त्यांच्या मार्गावर आली. ती पटोले यांना आडवी जाऊ नये म्हणून अरविंद शिंदे यांनी तिला तिथून हाकलून लावलं. मग या गोष्टीची चर्चा होणारच. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगला व्हायरल होत आहे.
पुणे पोटनिवडणुकबाबत चर्चा करायला नाना पटोले पुण्यात काँग्रेस भवनात आले. तिथे एक मांजर होती. ती पटोलेंना आडवी जाऊ नये म्हणून अरविंद शिंदेंनी तिला हाकलून लावलं. #nanapatole #Pune #Congress #Election pic.twitter.com/rs55tGTgvg
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) February 6, 2023