पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट मैदानाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचे नाव देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. ही मागणी धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांना केली आहे. त्यामुळे ही मागणी मान्य होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास शरद पवार यांच्या नावाने पुण्यात क्रिकेटचे स्टेडियम होऊ शकते. शरद पवार यांनी क्रिकेट विश्वात मोठी कामगिरी केली. याची पावती त्यांच्या नावाच्या रुपाने स्टेडियम होऊन मिळू शकते.