पुणे जिल्ह्यात पेट्रोल पंपावर दरोड्याची तयारी…नगरमधील मोक्कातील फरार आरोपी अटकेत

0
1029

पुणे : आळेफाटा येथे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली. यामध्ये मोक्कातील अहमदनगर येथील फरार आरोपी अंकुश खंडू पवार याच्यासह चौघांना ताब्यात घेतले असून यामधील तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. नगर-कल्याण महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील आळे शिवारात पहाटे ही कारवाई करण्यात आली. आरोपींनी आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच आणि पारनेर अहमदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

नवनाथ राजू पवार (वय 21, रा. ढोकी, पारनेर जि. अहमदनगर), अनिकेत बबन पवार पवार (वय 20, रा. साळवाडी, ता. जुन्नर), अंकुश खंडू पवार (रा. तांबवाडी वडगाव सावताळ, ता.पारनेर जि. अहमदनगर), प्रवीण दत्तात्रय आंबेकर (वय 25, रा.तांबवाडी वडगाव सावताळ, ता.पारनेर जि. अहमदनगर अशी अटक करण्यात आलेल्यांची आरोपींची नावे असून अमोल कैलास शिंदे (वय 21, रा. धोत्रे, पारनेर जि. अहमदनगर), विकास बर्डे (रा. लाखणगाव, ता. आंबेगाव जि. पुणे), विशाल खंडू पवार (रा. तांबवाडी वडगाव सावताळ, ता. पारनेर जि. अहमदनगर अशी फरार आरोपींची नावे आहेत.