उध्दव ठाकरेंची संघावर टिका…बड्या नेत्याचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

0
1614
Udhav Thackeray

पुणे – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या बीकेसी इथं जाहीर सभा घेतली. या सभेत शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपा, मनसेसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही प्रश्नचिन्ह उभे केले. उद्धव ठाकरेंच्या या भाषणामुळे नाराज झालेले शिवसेनेचे नेते पुण्याचे माजी शहरप्रमुख शाम देशपांडे यांनी थेट शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.

शाम देशपांडे यांनी पत्रक काढत म्हटलंय की, शिवसेना-भाजपा युती तुटल्याने अनेक शिवसैनिकांना दु:ख होत आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी संघावर टीका केल्याने क्लेश होत आहे. भाजपाच्या पूर्वीही संघ होता. संघाला राजकारणात ओढण्याची गरज नव्हती असं माझं प्रामाणिक मत आहे. संघाला राजकारणात ओढून उद्धव ठाकरेंनी बेगडी धर्मनिरपेक्षतावाद्याचा पदर घट्ट धरला आहे अशीच माझी भावना आहे. संघाच्या हिंदुत्वाला आक्रमकतेची योग्य दिशा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिली. आज आरएसएसवर टीका करून ती दिशा भरकटली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वादात ओढून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची री ओढली आहे. त्यामुळे आजपासून मी शिवसेना पक्षाचे काम थांबवत आहे असं त्यांनी सांगितले.