पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात; ४ महिला भाविकांचा जागीच मृत्यू,अपघातग्रस्त नगर जिल्ह्यातील

0
29

सोलापूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील चार महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील अपघातग्रस्त महिला भाविक रांजणगाव (ता. पारनेर जिल्हा अहमदनगर) येथून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघाल्या होत्या. दरम्यान, कार मोहोळ तालुक्यातील यावलीजवळ आली असता, बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. आदमअली मुनावरअली शेख (वय ३७ ), हिराबाई रामदास पवार (वय ७५), कमलाबाई मारूती वेताळ (वय ६० रा. रांजनगाव मशीद ता. पारनेर) अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांचा जागीच मृत्यू झाला. द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय ४० रा. राजंनगाव मशीद) अपघातात जखमी झाल्या होत्या. त्यांना सोलापूरच्या सिविहील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.