उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग यांच्यावतीने शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अजित पवार हे वेळेवर पोहचले मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे २० मिनिटे उशिरा या कार्यक्रमाला पोहचले, तोपर्यंत अजित पवार यांनी आपले भाषण सुरु केले. अजित पवारांचे भाषण सुरु असताना चंद्रकांत पाटील यांची एंट्री झाली. मात्र आपल्या भाषणाच्या शेवटी अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांच्या उशिरा येण्यावरून सगळ्यांसमोर पाटलांचे कान टोचले.
समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना उद्देशून अजित पवार म्हणाले कार्यक्रमाला लवकर जायला शिका. लवकर वेळेवर उठायला शिका. मात्र कर्यक्रमाला उशिरा आलेले चंद्रकांत पाटील स्टेजवर असताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केल्याने त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता हे सर्वच उपस्थितांच्या लक्षात आले.