पंजाबराव डख म्हणतात… पुढील 24 तासात राज्यात मुसळधार पाऊस

0
69

सध्या राज्यात गेल्या महिनाभरापासून पावसाचा खंड असून, परिणामी पिके करपू लागली आहेत. सध्या शेतकरी मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सुदैवाने, प्रख्यात हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकर्‍यांसाठी सकारात्मक बातमी दिली आहे, 3 सप्टेंबरपासून पाऊस सुरू होईल आणि संपूर्ण सप्टेंबर महिनाभर मुसळधार राहील असा अंदाज त्यांनी वर्तवला.
प्रख्यात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या मते, राज्यात 3 सप्टेंबरला पाऊस सुरू होईल आणि 12 सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी राहील, ज्यामुळे पिकांना दिलासा मिळेल. इतर हवामान संस्थांकडून दुष्काळाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी, दुष्काळी परिस्थिती टळून सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मुबलक पाऊस पडेल, असा विश्वास डख यांनी व्यक्त केला आहे.