Pushpa 2
पुष्पा’ चित्रपटानं संपूर्ण भारताला वेड लावलेलं पहायला मिळालं. गेल्या वर्षी पुष्पा पेक्षा मोठा धमाका करणारा अल्लू अर्जुन आता ‘पुष्पा 2’ मुळे चर्चेचा विषय ठरत असतो. चाहते ‘पुष्पा 2 या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे अनेकदा सोशल मीडियावर ‘पुष्पा 2’ विषयी चर्चा होत असते. अशातच अल्लू अर्जुनचा नवा जबरदस्त लुक समोर आलाय. त्यामुळे हा फोटो ‘पुष्पा 2’ च्या लुकचा असावा, असा तर्क नेटकऱ्यांनी लावला आहे. अल्लू अर्जुनचा हा लुक सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधत आहे.
अल्लू अर्जुननं त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. हातात सिगारेट, गडद चष्मा, स्टायलिश केस आणि लेदर जॅकेटमध्ये अल्लू अर्जुन पाहून चाहते हैराण झाले आहेत. या लुकवरुन अल्लूचा हा पुष्पा 2 मधील लुक असल्याचं चाहत्यांकडून म्हटलं जातंय.