‘पुष्पा’च्या यशानंतर रश्मिका मंदनाचं मानधन! प्रत्येक चित्रपटासाठी आकारतेय कोट्यवधी!

0
379

अल्लू अर्जुनसोबतच्या ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे रश्मिकला तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर रश्मिकाला आगामी चित्रपटात घेण्यासाठी अनेक निर्मात्यांची रांग लागली आहे.साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदना सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. लवकरच ती महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘गुड बाय’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच रश्मिकाने आपल्या मानधनात अर्थात फीमध्ये वाढ केली आहे.लवकरच रश्मिका अभिनेता अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा 2’मध्ये झळकणार आहे. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर आता ‘पुष्पा 2’ची देखील क्रेझ निर्माण झाली आहे.तर, दुसरीकडे साऊथमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर आता रश्मिका तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे.