मुंबई : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजितदादा परत आमच्यासोबत या, असं विधान त्यांनी केलंय. या विधानानं महाराष्ट्राच्या राजकारण पुन्हा खळबळ उडाली आहे. पुष्कर श्रोत्री यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी हे विधान केलंय.
पुष्कर श्रोत्री यांनी विखे पाटील यांना प्रश्न विचारताच, राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय की…. “अजितदादा परत आमच्यासोबत या, अजित पवार स्पष्टवक्ते आहेत, त्यांची कमिटमेन्ट आहे! त्यांना माझा एवढाच सल्ला आहे, आता परत तुम्ही बरोबर या, हाच मला त्यांना सल्ला द्यायचाय! बरोबर या, असा मला त्यांना सल्ला द्यायचाय…”
नुकतंच राज्यसभा निवडणूक पार पडली यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांना मागे सारत भाजपने सहावी जागा आपल्या पारड्यात पाडली. यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर अजित पवारांना भाजपसोबत येण्याचं आमंत्रणच दिलं आहे.






