9 तारखेला शिवतीर्थावर या, राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेचा ट्रेलर…मोठे खुलासे करणार!

0
15

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सामील होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. पण अद्याप काही ठोस निर्णय मनसेकडून तरी झाल्याचं दिसत नाही. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी दिल्लीवारी केली, तेव्हापासूनच मनसे महायुतीत सामील होणार या चर्चांना उधाण आलं होतं. पण नेमकं घडतंय काय? हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आहे. अशातच राज ठाकरेंनी आता मनसैनिकांना साद घातली आहे. मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय, असं म्हणत राज ठाकरेंनी गुडीपाडव्याच्या सभेत नेमकं काय घडतंय? सर्व सांगणार असल्याचं जाहीर केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन गुडीपाडव्याच्या मेळाव्याचा ट्रेलर लॉन्च केला आहे. “9 तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय… हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे!”, अशा कॅप्शनसह राज ठाकरेंनी गुडीपाडवा मेळाव्याचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.