Raj Thackeray Ayodhya Tour मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला आहे. तूर्तास हा दौरा स्थगित केला असल्याची घोषणा राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. 5 जून रोजी राज ठाकरेंचा अयोध्या दौरा होणार होता. हा दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. 22 मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहेत. आता पुण्यात 22 मे रोजी राज ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी पुण्यात मनसैनिकांकडून करण्यात येतेय. या सभेमध्ये राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहेत.
#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1
— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022