गुढीपाडवा मेळाव्यात भूमिका मांडल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना भूमिका बदलली नाही. धोरणावर कायम असल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. आज पत्रकार परिषदेमद्ये बोलताना त्यांनी प्रमुख शहरांमध्ये सभा घेणार असल्याचं सांगितलं
राज ठाकरे म्हणाले की, यंदा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचा आहे. त्याचं विश्लेषण देखील केलं आहे. पहिल्या पाच वर्षात जे पटलं नाही त्याचा विरोध देखील केला आहे. लोकं म्हणतात की, राज ठाकरे यांनी भूमिका बदलली आहे. भूमिका बदलली नाही. धोरणावर कायम असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.
३७० कलम हटलं, राम मंदिर झालं. १९७० पासून रखडलेली गोष्ट झाली. ज्या कार सेकाकांचा बळी गेला, त्यांचे आत्मे राम मंदिर उभे राहिल्यानंतर शांत झाले असतील, असंही त्यांनी बोलताना म्हटलं आहे. नरेंद्र मोदी नसते तर हा मुद्दा प्रलंबित राहिला असता, परंतु मोदींमुळे तो पूर्ण झाला आहे. आता त्यांना पुन्हा एकदा संधी देणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा दिल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं आहे






