महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची गणेश कला क्रीडा मंच येथे रविवार २२ मे रोजी सकाळी १० वाजता सभा होणार असल्याची माहिती मनसेने दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टिझर मनसेकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. टिझरमध्ये राज ठाकरेंच्या सुरुवातीला औरंगाबादच्या सभेतील एकदा काय ते होऊनच जाऊ दे… हे वाक्य घेण्यात आले आहे. तर टिझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणंही वाजत आहे. या टीझरवरून पुण्यातील सभा जोरदार होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.