Rak Thackeray…
गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दादारमधील शिवाजी पार्क येते आयोजित केलेल्या मेळाव्यामधील राज ठाकरेंनी भाषणामधून हिंदुत्ववादी भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. या सभेतील मुद्द्यांवरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आज संदीप देशपांडे आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंच्या शीवतीर्थ या नवीन घराच्या बाहेरुन फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज यांच्या पुढील सभेची घोषणा केलीय.
‘शीवतीर्थ’ या राज ठाकरेंच्या नव्या घरासमोरुन फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना संदीप देशपांडे यांनी, “राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेक क्रिया, प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. काही लोकांना मिर्च्या झोंबल्याचं बघायला मिळाल्या,” असं म्हटलं आहे. पुढे बोलताना देशपांडे यांनी, “ठाण्यामध्ये ९ एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे. गडकरी रंगायतनसमोर ही सभा होणार आहे,” असंही सांगितलं.






