उद्धव ठाकरेंचे फोटो पाहून राज ठाकरे म्हणाले… खूप छान दिवस होते, कोणी तरी विष कालवलं…

0
34

झी मराठीवरील खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाची गेली अनेक दिवसांपासून चर्चा आहे. कार्यक्रमाचा पहिला प्रोमो काही दिवसांआधी प्रदर्शित झाला होता.

कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात राज ठाकरे अवधुतच्या स्पेशल खुर्चीत बसलेत. समोर स्क्रिनवर राज ठाकरे आणि उद्धव यांच्या जुन्या फोटोंची एक चित्रफित सुरू आहे. दोघांच्या जुन्या आठवणी पाहून राज ठाकरे भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय.

चित्रफित संपल्यानंतर अवधुत राज ठाकरेंना विचारतोय, ‘काय वाटतं सगळं असं एकत्र पाहून?’ त्यावर राज ठाकरे भावुक झालेले पाहायला मिळत आहेत. ते उत्तर देत म्हणतात, ‘खूप छान दिवस होते ते. माहिती नाही मला कोणीतरी विष कालवलं किंवा नजर लागली’. राज ठाकरेंच्या या उत्तरावर अवधूत त्यांना ‘हे दिवस परत येऊ नाही शकणार?’, असं विचारतो, त्यावर राज ठाकरे काहीच बोलत नाहीत. त्यांचा भावुक झालेला चेहरा या ठिकाणी पाहायला मिळतोय.