एकनाथ शिंदेंची थेट राजस्थानात राजकीय खेळी, कॉंग्रेसचा बडा नेता शिवसेनेत…

0
51

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता थेट राजस्थानातच राजकीय भूकंप केला आहे. राजस्थानातील काँग्रेसचा एक बड्या आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या खास विश्वासू नेत्याने थेट शिंदे गटात प्रवेश केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते राजेंद्र गुढा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत राजस्थानच्या झुनझुनमध्ये गेले होते. यावेळी झालेल्या जाहीर आणि भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी गुढा यांना पक्षात प्रवेश दिला.